कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी विजयी होत.जायंट किलर ठरले असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली.त्यावेळी शैलेश टिळक,कुणाल टिळक यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
रिपोर्टर: सागर कासार